Monday, October 25, 2021

मोठा गौप्यस्फोट:शिवसेनेचा हा मंत्री लवकरच भाजपात?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री आहेत. त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यांना आपण लवकरच भाजपात घेणार आहोत, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी वसई दौर्‍यात केला आहे.

राज्यात भाजप-शिवसेना यांच्या कुरघोडी सुरू आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राणे मुंबई, कोकणच्या दौर्‍यावर आहेत. वसईत पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळले असून लवकरच भाजपात येतील असे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

मातोश्रीच्या आदेशाशिवाय त्यांना एकही सही करण्याचा आदेश नाही. त्यामुळे ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना पक्षात घेऊ आणि या सरकारचे विसर्जन करू असे सांगत राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. दरम्यान राणेंच्या या मोठ्या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत गुरुवारी गर्दी झाल्याने 19 गुन्हे दाखल झाले होते. तर शुक्रवारी 13 असे एकूण 32 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. हे सरकार राजकीय कुरघोडीने आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे,

दरम्यान मी ज्यांना शिवसेनेत आणले, तेच माझ्यावर टीका करतात, कारण माझ्यावर टीका केली तर मंत्रीपद मिळते असे सांगत निलम गोर्‍हे यांचा समाचार घेतला. निलम गोर्‍हे यांना शिवसेनेत मीच आणले, त्यांच्या आमदारकीसाठी मीच प्रयत्न केले. आता त्यांची पक्षात फरपट होत आहे. त्याकडे त्यांनी पहावे. माझ्यावर त्यांनी बोलू नये, असा टोला लगावला.

मनसे भाजप युती झाल्यास मला आनंद होईल असे सांगत राष्ट्रवादीवर होणार्‍या जातीवाचक आरोपाबाबत राणे यांनी हा मुद्दा बरोबर असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांचा मुद्दा मी तोडत नाही असे सांगत राज ठाकरे यांच्या वक्तव्याला राणे यांनी अप्रत्यक्ष समर्थन दिले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!