Monday, October 18, 2021

राज्यात २४ तासात वाढले इतके रुग्ण जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आज दिवसभरात १४५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ४ हजार ५७५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर ५ हजार ९१४ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.

यावरून असे दिसून येत आहे की, राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत व करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे.

दुसऱ्या बाजूला करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसून येत आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा मागील काही दिवसात सातत्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही अधिक आढळून आली आहे. तर, राज्यातील करोना निर्बंध जरी शिथिल केलेले असले

 तरी अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. याशिवाय, जर नियमांचे पालन केले नाही व रूग्णसंख्या वाढली तर परत लॉकडाउन लावावा लागेल, असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२७,२१९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,२०,५१० झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३५८१७ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२१,२४,२५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२०,५१० (१२.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,२०,९०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५३,९६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!