Monday, January 17, 2022

शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपातून क्लीन चिट, संजय राठोड म्हणतात, ‘सत्य…’

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: माजी मंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपां प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यानंतर ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही…..’ असं सूचक ट्वीट संजय राठोड यांनी केलं आहे. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे.

संजय राठोड यांच्याविरुद्ध अशी कोणतीही तक्रार नाही, असं यवतमाळ पोलिसांनी सांगितलं आहे.सत्य परेशान हो सकता है, पराजित नही…..’ असं ट्वीट संजय राठोड यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सीबीआय चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हेच वाक्य ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती.

राजकीय हेतू पोटी मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सुरु असल्याचा आरोप देशमुख यांनी त्यावेळी केला होता.विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजी मंत्री आणि शिवसेना आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठवलेला नाही.

या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही.

नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीड पोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमूद केलेल्या महिलेचा आणि महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीही संबंध नाही, असे यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितले आहे.

संजय राठोड यांच्यावर कोणते आरोप आहेत?

संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!