Friday, January 21, 2022

महिनाअखेरीस पाऊसवाढ; ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात सध्या पडलेला पाऊस सरासरीच्या श्रेणीमध्ये आहे. मात्र तरीही आत्तापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत आठ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. वायव्य, ईशान्य आणि पूर्व भारतामध्ये अनेक ठिकाणी पावसाची तूट आहे.

येत्या २१ ऑगस्टपर्यंत मान्सूनचा पाऊस वायव्य आणि मध्य भारतात बरसेल, असा अंदाज आहे. यासोबतच ऑगस्ट अखेरीस आणि स्पटेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढेल, असाही अंदाज आहे.

गुरुवारी वर्तवण्यात आलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार २६ ऑगस्टनंतर कोकणासह राज्यात पाऊसमान सुधारण्याची अपेक्षा आहे. २० ते २६ ऑगस्ट या कालावधीत मात्र कोकणात जास्त पाऊस नसेल. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पाऊस अपेक्षित आहे. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर

 तसेच २ सप्टेंबरनंतर पावसाचे प्रमाण वाढू शकते. महाराष्ट्रामध्ये सध्या सरीसरीहून सात टक्के पाऊस अधिक नोंदवला गेला आहे. आत्तापर्यंत राज्यात ७२८ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ७७७ मिलीमीटरपर्यंत पाऊस नोंदला गेला आहे.

आज, शुक्रवारीही राज्यात काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज आहे. यामध्ये पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायव्य महाराष्ट्र, बिहार येथे हळुहळू पावसाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. १९ ते २३ ऑगस्ट दरम्यान बिहार, पूर्व उत्तर प्रदेश येथे २३ ऑगस्टपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल.

यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसेल. पुढील दोन दिवसांमध्ये मध्य भारत आणि नजीकच्या दक्षिण भारतामध्येही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे २१ ऑगस्टपर्यंत सर्वदूर पाऊस असेल. यातही तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे.

कुठे अतिरिक्त…कुठे तूट

कोकणात सात टक्के, मध्य महाराष्ट्रात आठ टक्के, मराठवाड्यात १८ टक्के पाऊस आत्तापर्यंतच्या सरासरीच्या अतिरिक्त आहे. तर विदर्भात नऊ टक्क्यांची पावसाची तूट आहे. विदर्भातील चार जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट आणि सप्टेंबर अखेरीस पडणारा पाऊस दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!