Saturday, January 22, 2022

नगर ते थेट पुण्यापर्यंत भारतातील पहिलाच 100 किमीचा 3 मजली उड्डाणपूल?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगरकरांबरोबरच औरंगाबादकरांचाही पुणे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. अहमदनगरमधून थेट पुण्यापर्यंत १०० किमीचा ३ मजली उड्डाणपूल तयार होणार असून त्याच्या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच तीनमजली पूल असणार आहे.

त्यासाठी प्राथमिक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खासगी संस्थेला देण्यात येणार आहे.अहवालानंतर निविदा प्रक्रियेला वेग येईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिले. औरंगाबाद-नगर-पुणे हा चौपदरी रस्ता नेहमीच वर्दळीचा राहतो.

नगर शहर, शिरूर-वाघोली या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. ती कमी करण्यासाठी नगर बाह्यवळण रस्ता ते चंदननगर हा १०० किमीचा तीन मजली उड्डाणपूल तयार होणार आहे. त्यावर ७,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अहमदनगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्यापासून या तीनमजली उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. नगर बाह्यवळण रस्ता ते वाघोलीमार्गे चंदननगरपर्यंत आहे. त्याच रस्त्यावर ७,२०० कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकार हा पूल उभारणार आहे.

नगर शहरातील उड्डाणपुलाचे ५५% काम झाले आहे. मे २०२२ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्यांचा नगर शहरातील कोठला, चांदणी चौक, स्वस्तिक चौक या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बराच कालावधी जायचा. नव्या उड्डाणपुलामुळे औरंगाबादकरांची ३० मिनिटे वाचणार आहेत.

खासगी संस्थेकडून या प्रस्तावित तीनमजली उड्डाणपुलाचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करून केंद्र सरकार नकाशे तयार करणार आहे. यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल. २०२२ अखेरपर्यंत ती पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!