Saturday, January 22, 2022

यामुळे खा सुजय विखे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी एल्गार पुकारला आहे. मागील पाच वर्षांतील थकित वेतन व इतर थकबाकीसाठी उद्या सोमवारी (ता. २३) सकाळी दहा वाजेपासून बेमुदत उपोषण, विविध तीव्र आंदोलने करुन, आठ दिवसांनंतर सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

त्यामुळे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या काळातील एक ऑगस्ट २०१७ ते ३१ ऑगस्ट २०२१ अखेर थकित वेतन, वेतन आयोगाचा थकित फरक, भविष्य निर्वाह निधी, उपादान निधी, रिटेंशन अलौन्सची थकबाकी यासाठी कामगारांनी उपोषण, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कामगारांनी दहा दिवसापूर्वी तहसीलदार फसियोद्दीन शेख, सहाय्यक कामगार आयुक्त, कारखाना व पोलिस प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली. उपोषणाला बसणार्‍या कामगारांनी राहुरी येथे शनी मंदिरात थकित रकमा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. अशी शपथ घेतली.

सहाय्यक कामगार आयुक्त (नगर), कारखाना व्यवस्थापन व कामगारांची बुधवारी (ता. १८) व काल (शनिवारी) बैठक झाली. परंतु, कोणताही तोडगा निघाला नाही. काल (शनिवारी) कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे व संचालक मंडळाने कामगारांशी चर्चा करून, आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

परंतु, तोही फोल ठरला. कामगार नेते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर, राजू सांगळे, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे यांनी उपोषणाला बसणार असल्याचे ठामपणे सांगितले.

कामगार नेते इंद्रभान पेरणे म्हणाले, “मागील पाच वर्षात कामगारांचे २५ कोटी ३६ लाखांची थकबाकी आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे थकबाकी दिली नाही. तर, उद्या (सोमवार) पासून अन्नत्याग करून आमरण उपोषण, थाळीनाद ,जागरण गोंधळ, घंटानाद, अर्धनग्न आंदोलन, रस्ता रोको अशी टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल. आठ दिवसानंतर सामूहिक आत्मदहन केले जाईल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!