Saturday, January 22, 2022

रविवारी देखील राखी वाटपासाठी पोस्टमन कर्तव्यावर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे राखी. दरवर्षी रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन असं नेमका रविवारी आला. त्यामुळे बहिणीने पाठवलेल्या राख्या भावा पर्यंत वेळेवर पोहोचवण्याची मोठी जबाबदारी पोस्ट खात्यावर आली. शनिवार पर्यंत पोस्ट ऑफिस मध्ये आलेल्या सर्व राख्या पोचवण्यात आल्या होत्या परंतु रविवारी साप्ताहिक सुट्टी असून देखील पोस्ट खात्याने रविवारी देखील आलेल्या सर्व राख्या पोचवण्याची जबाबदारी पार पाडली. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोस्टमन हे रविवारी कर्तव्यावर होते.

पोस्ट ऑफिस मध्ये आलेले सर्व राखी टपाल त्यांनी वितरीत केले. जेणेकरून बहिणीने पाठविलेली राखी भावा पर्यंत सणादिवशी मिळेल. जर रविवारी या राख्या वितरित केल्या नसत्या तर त्या राख्या सोमवारी द्याव्या लागल्या असत्या परंतु रक्षाबंधनाचे महत्त्व निघून गेले असते, ही भावनिक बाब लक्षात घेऊन रक्षाबंधन सणा दिवशीच सर्व राख्या पोहोचवण्याची जबाबदारी पोस्ट खात्याने पार पाडली. एसटी महामंडळाने देखील टपाल बॅगांची वाहतूक रविवारी देखील केली, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये टपाल पोहोचवता आले. याबद्दल पोस्ट खात्याच्या पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती मधुमिता दास व अहमदनगर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक श्री एस. राम कृष्णा यांनी सर्व पोस्टमन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

काही लोक शनिवार पर्यंत राखी ची वाट पाहत होते परंतु शनिवारी पर्यंत राखी न मिळाल्याने ते निराश झाले होते व त्यांच्या बहिणीने पाठवलेली राखी या वर्षी सणादिवशी मिळनार नाही असे त्यांना वाटत होते, परंतु अचानक रविवारी पोस्टमन ने आपल्या घरी येऊन ज्यावेळी राखी दिली त्यावेळी त्यांना सुखद धक्का बसला व त्यांनी पोस्ट खात्याचे व पर्यायाने पोस्ट मन चे आभार मानले. जिल्ह्यामध्ये रविवारी टपाल वितरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती व त्यानुसार सुमारे ३००० राख्यांचे वाटप रविवारी करण्यात आले अशी माहिती डाक निरीक्षक संदीप हदगल यांनी दिली.

 

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!