Thursday, January 20, 2022

पैशांचा पाऊस, कमी कालावधीत दुप्पट फायदा, Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवा रक्कम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:पोस्ट ऑफीसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं. जर तुम्हीही गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी काही खास योजना आहेत. पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणुकीमुळे कोणत्याही प्रकारे नुकसान होण्याचा धोका नसतो.

तसेच सरकारने सप्टेंबरच्या तिमाहीत छोट्या योजनांमधील व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पोस्टाच्या या 8 योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला कमी कालावधीतच दुप्पट रक्कम मिळेल. कमी कालावधीत दुप्पट फायदा मिळवून देणाऱ्या या कोणत्या योजना आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

1 पोस्ट ऑफीस टाईम स्कीम (post office time deposit scheme)

1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 5.5%व्याज मिळत आहे. जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर तुम्ही गुंतवलेली रक्कम ही 13 वर्षात दुप्पट होईल. तसेच तुम्हाला 5 वर्षांच्या ठेवीवर 6.7% व्याज मिळत आहे. जर या व्याजदरासह पैसे गुंतवल्यास रक्कम 10.75 वर्षात दुप्पट होतील.

2 Post Office सेविंग बँक अकाउंट (Post Office Savings Bank Account)

जर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस बचत खात्यात ठेवले तर रक्कम दुप्पट होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागेल. कारण खात्यातील रक्कमेवर दरवर्षी फक्त 4.0 टक्के दरवर्षी व्याज मिळेल. म्हणजेच तुमची जमा रक्कम 18 वर्षात दुप्पट होईल.

3 पोस्ट ऑफीस रिकरिंग डिपॉझिट

पोस्ट ऑफीस रिकरिंग डिपॉझिट या योजनेत गुंतवणूक केल्यास 5.8% व्याज मिळेल. या व्याजदराने पैसे गुंतवले तर रक्कम 12.41 वर्षात दुप्पट होईल.

4. पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजना

पोस्टाच्या या योजनेत आता मासिक 6.6 टक्के व्याज मिळत आहे. या व्याजदराने गुंतवणूक केली तर 10.91 वर्षात रक्कम दुप्पट होईल.

5. Post Office सीनियर सिटिजंस सेविंग्स स्कीम

पोस्ट ऑफिस सीनियर सिटिजंस सेविंग्स स्कीमवर (SCSS)7.4% व्याज दिला जात आहे. या योजनेत तुमची रक्कम 9.73 वर्षांमध्ये दुप्पट होईल.

6. Post Office PPF

पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षांच्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंडवर (PPF) सध्या 7.1%व्याज मिळत आहे. या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 10.14 वर्षे लागतील.

7 पोस्ट ऑफीस सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 व्याज मिळत आहेत. मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या या विशेष योजनेत रक्कम दुप्पट होण्यासाठी 9.47 इतका कालवधी लागेल.

8. Post Office National Saving Certificate

पोस्टाच्या नॅशनल सेविंग सर्टीफिकेट या योजनेवर एकूण 6.8 टक्के व्याज दिलत आहे. ही 5 वर्षांची बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकरही वाचवता येईल. या व्याजदरानुसार गुंतवणूक केल्यास 10.59 वर्षात रक्कम दुप्पट होईल.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!