Monday, January 17, 2022

 पुढील इतके दिवस राज्यात पावसाचा खंड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी रिपरिप पाऊस झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा पावसानं दडी मारली आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पण आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

आजपासून पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता फार कमी आहे. राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात चांगली सुरुवात केल्यानंतर पुन्हा पावसानं उघडीप घेतली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.

राज्यात पाऊस सातत्यानं ब्रेक घेत असल्यानं शेतकरी समुदायात चिंतेचं  वातावरण पसरलं आहे. तसेच सततच्या ढगाळ हवामानामुळे शेतात उगवलेल्या थोड्याफार पिकांवर देखील रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नंदुरबार, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर अन्य ठिकाणी सरासरी एवढा पाऊस कोसळला आहे. तर अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, सातारा, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील आणखी पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!