Monday, January 17, 2022

नगर जिल्ह्याच्या शेजारीला जिल्हा हादरला रक्षाबंधनच्या दिवशी 28 वर्षीय विवाहितेवर …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचं वचन आपल्या लाडक्या बहिणींना देत आहे. पण, असं असलं तरी विकृत लोकांमुळे आजच्या दिवसाला गालबोट लागत आहे.

बीडमध्ये पुन्हा एकदा बलात्काराचे  प्रकरण समोर आले आहे. एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे.बीड जिल्ह्यात दररोज महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आज पुन्हा एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या शिंगारवाडी येथे उघडकीस आली आहे.चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शिंगारवाडी येथील 28 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. गावातीलच नात्यात असलेल्या विक्रम काळे याने हे कृत्य केलं आहे.

या नराधमाने पीडितेला सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन अत्याचार केले होते. तसंच शेतामध्ये काम करत असतानाजवळ कोणी नसल्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

सतत धमकी देऊन हा नराधम अत्याचार करत होता, त्यामुळे पीडितेनं महिलेने चकलांबा पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी विक्रम काळे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!