Friday, January 21, 2022

महसूलमंत्र्याचे खाजगी महसुलाकडे लक्ष- आचार्य तुषार भोसले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले संगमनेर दौर्यावर असताना संगमनेर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर घनाघाती टिका केली आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात ऐतिहासिक पंरपरा असलेले धार्मिक दर्जाचे अनेक मंदिरे आहेत, राज्यात महाविकास आघाडी चे तीन पक्षाचे सरकार आहे सरकार मध्ये प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार व त्याखालोखाल अंत्यत कमी वजन असलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा मतदारसंघात

संगमनेरकरानी ठाकरे सरकारच्या नाकावर टिच्चून मंदिरे खुली केली आहे, ठाकरे सरकारच्या तालिबानी नियमाना तिलांजली दिली आहे. भाविक भक्तांना पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यात मंदिरे पुजा-आरती व दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली त्यानिमित्ताने संगमनेरकरांचे मनापासून अभिनंदन.

राज्यातील जनतेला हुकूमशाही तालिबानी ठाकरे सरकारने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षे असताना देखील देवधर्म मंदिरात कडीकोंडा लावुन बंदिस्त केले आहे ही तालिबानी मानसिकता राज्यातील जनता सहन करणार नाही, हा सर्व एककलमी कार्यक्रम चालु आहे तो जनताच हाणुन पाडेल.
दारु व्यावसायात महसूल जास्त मिळतो

म्हणून दारुचे धंदे चालु आहे आणि मंदिर बंद आहे. शिर्डी देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे, येथे अनेक गोरगरीब, छोटे मोठे व्यावसायिक पोट भरतात पण त्याकडे तीन तीन मंत्री असुन दुर्लक्ष आहे स्थानिक मंत्री बाळासाहेब थोरात यांचे लक्ष नाही तर पालकमंत्री बाहेरचे आहे त्यांना लक्ष

घालण्यासाठी वेळ नाही अशी वाईट अवस्था या मंत्र्यांची झाली आहे. मंत्री मामा-भाचे यांचा डोळा शिर्डी संस्थानवर नियुक्ती होण्यासाठी आहे. पंरतु शिर्डीत लाखो गोरगरिबांची उपासमार होते याकडे महसूलमंत्र्याचे लक्ष नाही. स्थानिक मंत्री लक्ष घालत तेव्हा बाहेरचे असलेले पालकमंत्री कशाला लक्ष घालतील?

पालकमंत्री तर हरवले आहे काय असा प्रश्न नगरकराना पडतो आहे कोरोना काळातही चार चार महिने फिरकत नाही ही मोठी शोकांतिका आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान करतो की उद्या श्रावणी तिसरा सोमवार आहे जर राज्यातील मंदिरे उघडली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू अध्यात्मिक क्षेत्रातील अन्याय सहन करणार नाही,

मंदिरांवर अवलंबून असलेल्या गोरगरिबांची उपासमार आता सहन करणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले संगमनेर दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!