Thursday, January 20, 2022

महाराष्ट्रात 24 तासात वाढले इतके रुगण ;जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला. दरम्यान राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरतांना दिसत आहे. मात्र राज्यात आढळून येणाऱ्या करोनाच्या दैनंदिन आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

आज राज्यात ४ हजार ७८० करोना रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आजपर्यंत राज्यात ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा मागील काही दिवसात सातत्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही अधिक आढळून आली आहे. तर, राज्यातील करोना निर्बंध जरी शिथिल केलेले असले, तरी अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे.

याशिवाय, जर नियमांचे पालन केले नाही व रूग्णसंख्या वाढली तर परत लॉकडाउन लावावा लागेल, असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे.राज्यात आज ४ हजार १४१ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर १४५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

राज्यात आज रोजी एकूण ५३ हजार १८२ बाधित रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२२,९२,१३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२४,६५१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!