Thursday, January 20, 2022

आमदार निलेश लंके यांची बदनामी खपवून घेणार नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र. न्यूज :कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून आमदार निलेश लंके यांनी व निलेश लंके प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कोविड आरोग्य मंदिराच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील हजारो नागरिकांसह परराज्यातील नागरिकांचा जीव वाचवला आहे.

त्यांच्या कामाची दखल केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाने घेतली. परंतु जाणून बुजून आमदार लंके यांची प्रतिष्ठा मलिन करण्याच्या हेतूने बदनामी चालवली आहे.ती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव नरवडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.

दरम्यान बदनामी करणाऱ्या तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा कारभार संपूर्ण पारनेर तालुक्याने पाहिला असून विविध संघटनांकडून अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर झाले आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऐवढेच नव्हे तर तहसीलदार देवरे यांच्यावरील असलेले गंभीर आरोप सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी भोसले यांनी तहसीलदारांवर कारवाईबाबत विभागीय आयुक्तांना सहा पाणी अहवाल पाठविला आहे.

आपल्यावरील कारवाई टाळावी या हेतूनेच त्यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियात व्हायरल केली. त्यात त्यांनी लोकनेते आमदार निलेश लंके साहेब यांच्यावर व कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे आरोप केले आहेत. कोणाच्या तरी सांगण्यावरुन आमदार निलेश लंके यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचे दिसून येत आहे.

आमदार निलेश लंके साहेब यांची बदनामी केल्याबद्दल तहसीलदार देवरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव नरवडे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!