Thursday, August 11, 2022

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर घनाघाती टीका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:- भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले संगमनेर दौर्यावर असताना संगमनेर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर घनाघाती टिका केली आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात ऐतिहासिक पंरपरा असलेले धार्मिक दर्जाचे अनेक मंदिरे आहेत, राज्यात महाविकास आघाडी चे तीन पक्षाचे सरकार आहे सरकार मध्ये प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार व त्याखालोखाल अंत्यत कमी वजन असलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या

विधानसभा मतदारसंघात संगमनेरकरानी ठाकरे सरकारच्या नाकावर टिच्चून मंदिरे खुली केली आहे, ठाकरे सरकारच्या तालिबानी नियमाना तिलांजली दिली आहे. भाविक भक्तांना पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यात मंदिरे पुजा-आरती व दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली त्यानिमित्ताने संगमनेरकरांचे मनापासून अभिनंदन.

राज्यातील जनतेला हुकूमशाही तालिबानी ठाकरे सरकारने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षे असताना देखील देवधर्म मंदिरात कडीकोंडा लावुन बंदिस्त केले आहे ही तालिबानी मानसिकता राज्यातील जनता सहन करणार नाही, हा सर्व एककलमी कार्यक्रम चालु आहे तो जनताच हाणुन पाडेल.
दारु व्यावसायात महसूल जास्त मिळतो म्हणून दारुचे धंदे चालु आहे आणि मंदिर बंद आहे.

शिर्डी देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे, येथे अनेक गोरगरीब, छोटे मोठे व्यावसायिक पोट भरतात पण त्याकडे तीन तीन मंत्री असुन दुर्लक्ष आहे स्थानिक मंत्री बाळासाहेब थोरात यांचे लक्ष नाही तर पालकमंत्री बाहेरचे आहे त्यांना लक्ष घालण्यासाठी वेळ नाही अशी वाईट अवस्था या मंत्र्यांची झाली आहे.

मंत्री मामा-भाचे यांचा डोळा शिर्डी संस्थानवर नियुक्ती होण्यासाठी आहे. पंरतु शिर्डीत लाखो गोरगरिबांची उपासमार होते याकडे महसूलमंत्र्याचे लक्ष नाही. स्थानिक मंत्री लक्ष घालत तेव्हा बाहेरचे असलेले पालकमंत्री कशाला लक्ष घालतील? पालकमंत्री तर हरवले आहे काय असा प्रश्न नगरकराना पडतो आहे कोरोना काळातही चार चार महिने फिरकत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!