Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यात :अल्पवयीन मुलीचा विवाह लावला ;मुलीची आई, आजी, मामा व नवरदेवावर गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी मुलीची आई, आजी, मामा व नवरदेवावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलाने फिर्याद दिली आहे. यातील तीन आरोपी हे शिरुर कासार तालुक्यातील बावी (येळंब) येथील असून आरोपी नवरदेव हा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील आहे.

हा गुन्हा चकलंबा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे लग्न अंदाजे 18 वर्षापुर्वी झालेले असून माझी पत्नी हिचेपासुन मला तीन मुली व एक मुलगा आहे. माझे पत्नीबरोबर किरकोळ कारणावरुन वाद व्हायचे तेव्हा ती मला म्हणायची की, तुमच्याकडे काहीच काम नाही.

तुम्ही माझ्या माहेरी चला, असे म्हणायची. तेव्हा मी तीचे माहेरी (येळंब) बावी, ता. शिरुर कासार येथे जायचे नाही असे म्हणालो असता माझी सासु आमच्या घरी आली व माझ्या पत्नीला व मुलांना घेऊन गेली. तेव्हापासुन मुले व माझी पत्नी हे परत माझ्याकडे आलेच नाही. माझी पत्नी सद्या शिक्रापुर – पुणे येथे मुलाबाळांसह राहते.

मी हिंगेवाडी येथे माझे वडीलांसोबत राहतो व मजुरीचे काम करुन आमचा दोघांचा उदरनिर्वाह करतो.माझ्या साडूने दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी मित्राच्या फोनवर मुलगी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केशव उर्फ सोमनाथ पांडुरंग भवर याचे सोबत लग्न करणार असल्याची लग्नपत्रीका पाठविली.

त्या लग्नपत्रीकेत दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी कुढेकर वस्ती, बोधेगाव येथे विवाहस्थळ असल्याचे त्यात नमुद होते. त्याप्रमाणे मी दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी चाईल्ड लाईन यांचा संपर्क क्रमांक 1098 वर फोन करुन अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याबाबत माहिती कळविली होती. त्यानंतर चाईल्ड लाईनचे अधिकारी यांनी मला फोनद्वारे

कळविले की, तुमच्या माहितीप्रमाणे आम्ही शेवगाव येथील पोलिसांना कळविले होते व त्याप्रमाणे शेवगाव पोलीस तुम्ही सांगत असलेल्या पत्त्यावर गेले असता त्यांचे घर बंद आहेत, असे त्यांनी मला कळविले होते.त्यानंतर शेवगाव पोलिसांनी मला कळविले की, दि. 16 ऑगस्ट व 18 ऑगस्ट 2021 रोजी शेवगाव येथील बोधेगाव बीटचे

पोलीस अंमलदार तेथील ग्रामसेवकांसोबत लग्नपत्रीकेतील विवाहस्थळी जाऊन खात्री केली. मात्र बालविवाह होत असलेबाबत शेवगाव पोलिसांना माहित झाले आहे. याची कुणकुण लागताच संबंधीत लोकं हे तेथुन कठेतरी निघुन गेले.
दि. 22 ऑगस्ट 2021 रोजी मला कळाले की, माझ्या मुलीचा बालविवाह हा केशव उर्फ सोमनाथ पांडुरंग भवर (रा. बोधेगाव) याचे सोबत

दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी नियोजित ठिकाणी न करता गायकवाडी जळगाव (चकलंबा पोलिस ठाणे हद्द, ता. गेवराई, जि. बीड) येथील अंध अपंगाची शाळा येथे झाला.
याप्रकरणी माझ्या मुलीचा जाणिवपुर्वक बालविवाह हा पत्नी रंजना अंकुश बिलारे (वय 35 वर्ष), मेव्हणा बबलु विष्णू मोरे (वय 32 वर्षे), माझी सासू विजुबाई विष्णू मोरे (वय 62 वर्षे) व केशव उर्फ सोमनाथ पांडुरंग भवर

यांनी करून दिला असून यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा हा चकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने चकलंबा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!