Tuesday, January 18, 2022

सावधान:फोनमधून लगेच डिलीट करा हे 8 Apps, Google नेही केलं बॅन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही महिन्यांपासून क्रिप्टोकरन्सीची मोठी चर्चा असून अनेकांनी यात आवडही दाखवली आहे. याचाच फायदा आता हॅकर्सकडून घेतला जात असल्याचं समोर आलं आहे.

हॅकर्स विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनव्या पद्धती शोधत असतात. आता क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेंडमध्ये याद्वारे फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी युजर्सला मॅलिशिअस अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी सांगितलं जातं.

यात धोकादायक मालवेअर आणि अ‍ॅडवेअर असतात. हे अ‍ॅप्स इन्स्टॉल झाल्यानंतर युजरचा डेटा हॅक केला जातो. परंतु गुगलने अशा काही अ‍ॅप्सची ओळख करुन ते गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत.Google ने एकूण 8 धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन डिलीट केले आहेत, जे क्रिप्टोकरन्सी संदर्भात असल्याचं सांगितलं जात होतं.

यात अ‍ॅप्समध्ये युजर्सला गुंतवणूक करण्यासाठी सांगून त्याद्वारे मोठी कमाई होईल असं सांगितलं जात होतं. हे अ‍ॅप्स लोकांची अ‍ॅड्सद्वारे फसवणूक करत होते.सिक्योरिटी फर्म ट्रेंड मायक्रोने याबाबतची माहिती गुगल प्ले स्टोरला दिली आणि त्यानंतर गुगलकडून हे धोकादायक अ‍ॅप्स हटवण्यात आले.

– BitFunds – Crypto Cloud Mining
– Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
– Ethereum (ETH) – Pool Mining Cloud
– Daily Bitcoin Rewards
– Cloud Based Mining System
– Bitcoin Miner – Cloud Mining
– Crypto Holic – Bitcoin Cloud Mining
– Bitcoin 2021
– MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner

महत्त्वाची बाब म्हणजे, गुगलने हे अ‍ॅप्स हटवले असले, तरी ज्या युजर्सनी हे अ‍ॅप्स डाउनलोड केले होते, त्यांच्या फोनमध्ये हे असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे हे 8 अ‍ॅप्स फोनमध्ये असल्याच लगेच डिलीट करण्याचं सांगण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!