Friday, January 21, 2022

करोनाची तिसरी लाट रूग्णांना लुटणार्‍यांसाठी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आ. निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखालील भाळवणी येथील शरद पवार आरोग्य मंदिरात श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये इंदोरीकर यांनी कीर्तनसेवा अर्पण केली.

करोनाची लाट ही गरिबांना लुटणार्‍यांसाठी येणार आहे. करोनामुळे माणसं भांबावली, त्यांनी डॉक्टरची पदवी पाहिली नाही, तज्ज्ञ पाहिला नाही आणि डॉक्टरांनीही रुग्णांना लुटण्याचा तडाखा उठविला. ज्यांनी रुग्णांना लुटलं त्यांचे वाटोळे होणार.

गरिबांचा तळतळाट कधी कोणत्या रूपाने बसेल हे सांगता येणार नाही, असे सांगत हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी करोना रुग्णांकडून भरमसाठ बिले उकळणार्‍या डॉक्टरांवर जोरदार प्रहार केला.भाळवणीच्या आरोग्य मंदिरातून एक माणूस बरा होऊन गेला तर त्याच्या मुखातून पडणारा शब्द काशीच्या अमृतापेक्षाही मोठा आहे.

गरिबांची सेवा केल्यावर माणूस देव होत नाही, देवपण मात्र आल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत हॉस्पिटल विकत घेणारी माणसं होती. महिनाभर डॉक्टर ठेवणारी लोकं होती. रुग्णाच्या वजनाइतके पैसे देणारी लोकं होती. पण ते रुग्ण वाचले नाहीत. मित्र, पाहुणे, संपत्ती, ऐश्वर्य कामाला येत नाही. मात्र, चांगले कर्म वाया जात नाही. पुण्याला थोडा उशिर आहे, पण फळ निश्चित आहे.

लंके 288 आमदारांमधील बच्चन!
शरीर थकले तरी मन थकू देऊ नका, आज प्रत्येकाला आधाराची गरज आहे. भाळवणीचे आरोग्य मंदीर नसते तर गोरगरीब जनतेचे हाल झाले असते. अनेकांनी दागीने मोडून रुग्णालयांची बिले भरली. जे रुग्ण येथे उपचार घेउन गेले त्या रुग्णांच्या नातेवाईकांचेही कल्याण झाले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!