Saturday, January 22, 2022

तहसीलदार देवरे यांच्या बाजूने उभे राहण्यावरून महसूल कर्मचाऱ्यांत फूट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बाजूने उभे राहण्यावरून महसूल कर्मचाऱ्यांत फूट पडली आहे. देवरे यांच्यावरील अन्यायाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी २३ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांच्या संघटनेनं दिला आहे.

तर देवरे यांची बदली करा किंवा आमची तरी तालुक्याबाहेर बदली करा, अन्यथा २५ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पारनेर तालुका तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दिला आहे. तहसीलदार देवरे राजकीय दृष्टया सक्रीय असल्यासारख्या वागतात, असा गंभीर आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पारनेर तालुक्यातील तलाठी संघटना व महसूल कर्मचारी संघटना यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांना एक निवेदन पाठवून हा इशारा दिला आहे. त्यावर संघटनेच्या ४१ सदस्यांच्या सह्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदार देवरे यांच्या मनमानी कारभाराविरोधात १५ मे २०२० रोजीच निवेदन दिलं होतं.

त्यानंतर प्रांताधिकारी सुधाकर भोसले आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. करोनाची परिस्थिती असल्याने आंदोलन करून नये, अशी विनंती केली होती. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित ठेवले. मात्र, त्यात आम्ही अपेक्षित केलेल्या कारभारातील सुधारणा अद्याप झालेल्या नाहीत.

लोकसभा-विधानसभा निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक तसंच कोविड सेंटरसाठी कर्मचाऱ्यांनी खिशातून केलेल्या खर्चाची बिले अद्याप मिळालेली नाहीत. देवरे यांची महिलांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दडपशाहीचं धोरण आहे. दबाव टाकून चुकीची कामे करून घेतात.

नियोजन शून्य आणि राजकीय दृष्टया सक्रीय होऊन त्या कामकाज करतात. त्यामुळे पूर्वीपासून कर्मचारी त्यांच्या कारभाराला वैतागलेले आहेत, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.या निवेदनात काही कामांची उदाहरणेही देण्यात आली आहेत. देवरे यांच्या या पद्धतीचे हाताखालील कर्मचाऱ्यांना दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.

त्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देत असतात. त्यामुळे आमची तालुक्यात काम करण्याची इच्छा राहिलेली नाही. एक तर त्यांची बदली करा किंवा आमच्या तरी तालुक्याबाहेर बदल्या करा, अन्यथा २५ ऑगस्टपासूनन बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!