Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यातील त्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी औरंगाबादेतून एकास अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील चितळी येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलिसांनी आज (रविवारी) रात्री औरंगाबाद येथून एकास अटक केली. आकाश राधू खरात असे आरोपीचे नाव असून त्याच्या शोधासाठी तीन पोलीस पथके तैनात केली होती.

पोलिसांनी चौफेर शोध घेत अखेर आरोपीला औरंगाबाद येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरातुन ताब्यात घेतले. पोलीसांनी आज सकाळी त्याला येथील तालुका पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर राहाता येथील न्यायालयासमोर आरोपीला हजर केले.

त्यावेळी न्यायालयाने आरोपीला पुढील तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक अतुल बोरसे यांनी सांगितली. एका अल्पवयीन मुलीचा गुरुवारी (ता. १९) गळफास घेतलेल्या अवस्थेत आकाश याच्या घरात मृतदेह आढळला होता. पोलीसांनी घटनास्थळी जावुन प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करुन आरोपीचे नाव सांगितले. पोलीसांनी काल (शनिवारी) सदर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आकाश खरात (वय २१) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आणि तात्काळ शोध घेत आरोपीला औरंगाबाद येथून अटक केली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!