Tuesday, January 18, 2022

नव्या भारतात हे चालतं का?; तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवल्याने भाजपाविरोधात संताप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. दरम्यान रविवारी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपा नेत्यांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे सध्या संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला जात असताना तिरंग्यावर भाजपाने पक्षाचा झेंडा ठेवला होता.

यावरुन विरोधकांनी नाराजी जाहीर केली असून संताप व्यक्त करत नव्या भारतात हे चालतं का ? अशी विचारणा केली आहे.युथ काँग्रेसचे श्रीनिवास बीव्ही यांनी फोटो ट्वीट करत नव्या भारतात पक्षाचा झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का? असा सवाल विचारला आहे.भाजपाचा झेंडा तिरंग्याच्या वरती! स्वयंघोषित राष्ट्रभक्त तिरंग्याचा आदर करत आहेत की अपमान? अशी विचारणा युथ काँग्रेसने ट्विटरवरुन केली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीदेखील भाजपावर टीका केली आहे. देशापेक्षा मोठा पक्ष, तिरंग्याच्या वरती झेंडा. भाजपा नेहमीप्रमाणे..कोणतीही खंत, पश्चात्ताप, खेद, दु:ख नाही अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.भाजपाने ट्वीट केलेल्या फोटोत कल्याण सिंह यांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळलेला दिसत आहे. यावेळी तिरंग्यावर अर्ध्या भागात भाजपाचा झेंडाही दिसत आहे.

यामुले विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी लखनऊमध्ये पोहोतून कल्याण सिंह यांचं अंत्यदर्शन घेतलं.कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.

त्यांना ४ जुलै रोजी गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते जवळजवळ बेशुद्धावस्थेत होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आलं होतं. शनिवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!