Thursday, January 20, 2022

तुम्हाला ही SBI बँकेकडून ‘हा’ मेसेज आला तर लगेच सावध व्हा… कारण तो मेसेज बँकेचा नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून अनेक बँकिंग कामे करण्याची सुविधा देत आहे. नवीन बँक खाते उघडण्यापासून पैसे हस्तांतरित करण्याचे काम ग्राहक ऑनलाइनद्वारे करू शकतात. यासह, ग्राहकांना अनेक सुविधा पुरवण्याबरोबरच बँक त्यांना जागरूक करण्याचे काम करते आणि वेळोवेळी त्यांना अपडेट करत राहते.

परंतु, या दरम्यान अनेक सायबर क्राईम करणारे लोकांना बँकांसारखे संदेश पाठवून आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढून लोकांची लूट करत आहेत.आजकाल एसबीआयच्या अनेक ग्राहकांना पॅन कार्डसंदर्भात एक संदेश येत आहे, ज्यात एसबीआय योनो अॅप खाते निलंबित केल्याचे लोकांना सांगितले जात आहे.

यावर बँकेने एक अलर्टही जारी केला आहे आणि बँकेने ग्राहकांना अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये असे कळवले आहे.
अशा परिस्थितीत तुम्ही सुद्धा जाणून घ्या की, हे लोक नक्की काय संदेश पाठवतात? ज्यापासून लोकांनी लांब राहिलं पाहिजे.

लोकांना ‘हा’ संदेश मिळत आहे

डीएर SBI यूझर, तुमचे SBI Yono खाते ब्लॉक केले गेले आहे. तुम्ही तुमचा पॅनकार्ड अपडेट करुन घ्या. पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी आम्ही खाली एक लिंक देत आहेत त्यावर क्लिक करा आणि खाते अपडेट करा असे सांगून ग्राहकांना संदेश पाठवत आहेत. तुम्ही तुमचे पॅन कार्ड अपडेट करा.

परंतु त्यांनी पाठवलेली लिंक ही बँकेची नसते. जरी या वेबसाइटचे नाव एसबीआय सारखेच आहे, परंतु ती एसबीआयची नाही. त्यामुळे या लिंकला भेट देणे ग्राहकासाठी धोक्याचे ठरु शकते.

बँकेने काय सांगितले आहे?

ग्राहकांना असे मेसेज आल्यानंतर ग्राहकांनी ट्विटरच्या माध्यमातून बँकेला या विषयी माहिती दिली आहे. यावर बँकेने उत्तर दिले आहे की, ‘ही माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमच्या जागरूकतेचे कौतुक करतो. आम्ही आमच्या ग्राहकांना लिंक्स, कॉल, एसएमएस, यूजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, पिन, सीव्हीव्ही सारखे वैयक्तिक आणि बँकिंग तपशील विचारणाऱ्या ईमेलला प्रतिसाद न देण्याचा सल्ला देतो.”

अशा परिस्थितीत, Phishing/Smishing/Vishing attempt बद्दलची तक्रार ग्राहक report.phishing@sbi.co.in या ईमेलवर करु शकतात. त्याव्यतिरिक्त तुम्ही हेल्पलाईन क्रमांक 155269 किंवा स्थानिक कायदा अंमलबजावणी एजन्सीला याबाबत माहिती देऊ शकता.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!