Tuesday, January 18, 2022

कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा राज्यात अधिक फैलाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली. मात्र राज्यात डेल्टा व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. राज्यात सातत्यानं कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा सातत्यानं फैलाव होताना दिसतोय. लसीकरण झालेल्या लोकांनाही या व्हेरिएंटची लागण होत असल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे.

जुलै महिन्यात राज्यातील 88 टक्के रुग्णांना B.1.617.2 स्वरुपाच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं होतं. चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येही हाच कल दिसून आला. इंडियन सार्स-कोव-2 जिनोमिक कन्सॉर्शिया (INSSOG) नं रविवारी हा ताजा अहवाल जारी केला. त्यामुळे सरकार चांगलंच चिंतेत आहे.

पुढे या अहवालात म्हटलं आहे की, 28 प्रयोगशाळांकडून करण्यात आलेल्या 51,996 नमुन्यांपैकी 11968 नमुने राज्यातील होते. अनेक राज्यातही हा व्हायरस आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना याची लागण होत आहे.

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी 4 हजार 780 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर गेला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 4 हजार 141 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!