Monday, January 17, 2022

राज्यात पुन्हा पावसाचा लागणार मोठा खंड ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी हलक्या सरी कोसळल्यानंतर राज्यात पुन्हा मान्सूननं ब्रेक घेतला आहे. पुढील दहा दिवस राज्यातून मान्सून गायब असेल, अशी माहिती हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा राज्यातून पाऊस गायब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं कमबॅक होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र पावसानं उघडीप घेतली होती. त्यानंतर महिन्याच्या शेवटी चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली आहे. असं असलं तरी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून पुन्हा दणक्यात आगमन करण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं की, ‘आठवडाभर सरी कोसळल्यानंतर राज्यातून पुन्हा मान्सून गायब होण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल. पण पावसाचं प्रमाण अत्यल्प असणार आहे.

काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळू शकतात. जुलै महिन्याच्या शेवटी वर्तवलेल्या सुधारित अंदाजात म्हटल्यानुसार, ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा एकत्रित विचार केला असता, राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

मात्र पुढील किमान दहा दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार असल्याचंही होसाळीकर यांनी सांगितलं आहे. या आधीच मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं पुढील चार ते पाच दिवस राज्यात कोणताही इशारा दिला नाही. पुढील पाच दिवस राज्यात

पावसाची उघडीप असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!