Saturday, January 22, 2022

एकच खळबळ:काँग्रेस नेत्याचा लेटर बॉम्ब, महाराष्ट्रातील या काँग्रेसच्याच मंत्र्यांवर 210 कोटी बुडवल्याचा आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी लेटर बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली आहे. आशिष देशमुख यांनी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर बँकेचे 150 कोटी रुपये बुडवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्क करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले आहे.आशिष देशमुख यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात त्यांनी सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत केलेला भ्रष्टाचार व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

2002 मध्ये सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे १५० कोटी रुपये खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवली आणि पूर्ण रक्कम गमवावी लागली. या दलाल कंपन्या सुनील केदार यांनी संगनमताने ही रक्कम सरकारी रोखे विकत घेण्यासाठी परस्पर दिली होती.

या दलालांनी त्या संपूर्ण रक्कमेचा अपहार करून बँकेला ना रोखे दिले ना पैसे परत दिले व नागपूर जिल्हा बँकेचे १५० कोटीचे नुकसान झाले, असा आरोप देशमुख यांनी केला.

या प्रकरणी केदार आणि इतर १० जणांविरोधात खटला कोर्टात सुरू आहे. सुनावणी अंतिम टप्पामध्ये आहे. याठिकाणी सुनील केदार यांनी केवळ नागपूर जिल्हा बँकेचे १५० कोटींचे नुकसान केले नसून २००२ साली त्यांचे मित्र शरद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वर्धा बँकेत सुद्धा ३० कोटी रुपये

या कंपन्यांमध्ये गुंतवण्यासाठी दबाव टाकला होता. असाच प्रकार त्यांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष पवनराजे निंबाळकर यांच्या बाबतीत केला होता. त्यांनी राज्यातील एकूण ३ बँकेचे २१० कोटींचे नुकसान केले आहे, असा गंभीर आरोप देशमुख यांनी केला.

हे सगळे गैरप्रकार झाले असताना सुनील केदार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन कायद्याची पळवाट शोधली आणि खटला प्रलंबित ठेवला. गेल्या १९ वर्षात ते सावनेर मतदारसंघातून चार वेळा आमदार निवडून आले आणि आता मंत्रिमंडळात आहे. ही राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे, असंही देशमुख म्हणाले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!