Thursday, January 20, 2022

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने सोयामिल आयात करून व सूर्यफूल सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे आता सोयाबीनचे दर तिन-ते चार हजार रुपयांनी कमी झाले आहेत. शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येईपर्यंत हा दर आणखी कमी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने, केंद्राच्या वरील दोन्ही निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामसभेचे ठराव घेऊन केंद्र सरकारला पाठवावेत, असे आवाहन शिवसेना नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.

कधी नव्हे ते सोयाबीनच्या दराने दहा हजारी ओलांडली होती. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालाच नाही. परंतु, येणाऱ्या हंगामांमध्ये तरी शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळेल. अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

आपल्या देशानेच 3 लाख मेट्रिक टन Non-GM सोयामिल केले होते निर्यात पोल्ट्री उद्योगात खाद्य तयार करतांना 15% सोयाबीन DOC म्हणजे सोयामील वापरण्यात येतो. आपल्या देशातील सर्व पौल्ट्री उद्योगाची संपूर्ण वर्षाची सोयामिलची गरज अंदाजे 10 लाख मेट्रिक टन एवढी आहे. देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पन्नातून अंदाजे 12 ते 14 लाख मेट्रिक टन

सोयामिल हे आपल्या देशातून 3 लाख मेट्रिक टन Non-GM सोयामिल निर्यात करण्यात आले. म्हणजे, आपली अंदाजे 10 लाख मेट्रिक टनाची गरज भागवून आपण निर्यात सुद्धा केली आहे.(दि. 11 ऑगस्ट 2021)च्या मत्स्य, पशुसवर्धन व दुग्धव्यवसाय केंद्रीय मंत्रालय यांच्या पत्रांनुसार 15 लाख मेट्रिक टन सोयामीलची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

15 लाख मेट्रिक टन सोयामीलची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकार निर्णय जाहीर होताच बाजारातील सोयाबीनचे दर 4000 ते 5000 हजार रुपये प्रती क्विंटलनी घसरले आहेत. सोयाबीन खरेदी दारांनी सोयामिल आयातीचा बागुलबुवा पुढे करत सोयाबीनचे दर 4300 ते 4000 हजारांनी कमी केले आहेत.

पुढील महिन्यापासून देशांतर्गत सोयाबीनची काढणी चालू होऊन शेतकर्‍याकडील सोयाबीन बाजारात येण्याची वेळ आणि आयात सोयामील देशात येण्याची वेळ एकावेळी येणार असल्यामुळे बाजारातील सोयाबीन दरात प्रचंड घसरण होऊन सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली जाण्याची जास्त शक्यता आहे.

केवळ पौल्ट्री उद्योगाला फायदा व्हावा म्हणून, हा निर्णय घेण्यात आला. २० ऑगस्ट रोजी सोयाबीन सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील शुल्क कमी करून शेतकरीविरोधी धोरण राबवले जात आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!