Friday, January 21, 2022

हे छगन भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा, परत डोकं वर काढतायत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ओबीसी आरक्षणाच्या इम्पेरिकल डाटावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “हे भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे.

ते परत डोकं वर काढत आहेत”, असा बोचरा वार नारायण राणे यांनी केला. ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा केंद्राने पुरवावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यासाठी छगन भुजबळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावरुन नारायण राणे यांनी हल्लाबोल केला.

नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा आज कोकणात आहे. या यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.आरक्षणचा मुद्दा क्लियर झालेला आहे. मराठा आणि ओबीसीचा मुद्दा क्लियर केले आहे. छगन भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना दिल्लीत पाठवू नये.

तुम्ही सत्तेत होता 15 वर्ष काय केले? आता आम्ही काही तरी करत आहोत. आता राज्यात विरोधी पक्षात बसा, आता बस झालं तुमचं, असं नारायण राणे म्हणाले.नारायण राणे म्हणाले, “महापुरानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला 700 कोटी रुपये पाठवले, आता राज्य सरकारने ते पैसे तातडीने वाटावे, अन्यथा मी परत पंतप्रधानांना सांगेन की आपली मदत वाटली गेली नाही, लोकांना मदत मिळत नाही”..

मुंबई, महाराष्ट्र ताब्यात द्या

हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे. शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशिर्वाद असतो, अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!