Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील हा लोकप्रतिनिधी २५ वर्षे सत्तेत राहणार इंदोरीकर महाराजांची भविष्यवाणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांनी निलेश लंके यांच्या समर्थनात भाष्य केले आहे.

 इंदुरीकर महाराज‘‘आमदार नीलेश लंके यांनी उभारलेल्या कोरोना सेंटरच्या माध्यामातून हजारो गोरगरीब रुग्ण मोफत उपचार घेऊन घरी परतले. त्यांचे आशीर्वाद लंके यांना लाभले आहेत. त्यामुळे ते आगामी २५ वर्षे आमदार राहतील,’’ असे उद्‍गार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी काढले.

तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरात आयोजित हरिनाम सप्ताहात आयोजित कीर्तनात ते बोलत होते. राज्यातील अनेक साखर, शिक्षण सम्राट, उद्योगपती आमदार आहेत. परंतु कुणालाही ही संकल्पना सुचली नाही. लंके यांनी ती प्रत्यक्ष करून दाखवली. देश-विदेशातही या माणसाचा

नावलौकिक झाला, तरीही ते सामान्य कार्यकर्ता म्हणून रुग्णांमध्ये बसून कीर्तन ऐकत आहेत. या लंके यांच्या साधेपणाचे कौतुकही इंदुरीकर यांनी केले. लंके यांनी सुरू केलेल्या या कोरोना सेंटरमधून सुमारे २२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गरीबांची सेवा केल्यावर माणूस देव होत नाही. मात्र त्याला देवपण आल्याशिवाय राहत नाही. हजारो रुग्णांच्या उपचारांची व्यवस्था करणारे नीलेश लंके त्या रुग्णांसाठी केवळ आमदार नाहीत तर देव आहेत‌. मानवाची सेवा हीच ईश्‍वर सेवा असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणालेनगर जिल्ह्यातील हा लोकप्रतिनिधी २५ वर्षे सत्तेत राहणार इंदोरीकर महाराजांची भविष्यवाणी. “आमदार लंके समाजाच्या भल्यासाठी काम करीत आहेत.

चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच. जितका त्रास जास्त होतो तेवढा माणूस मोठा होतो.”, असे देखील इंदुरीकर महाराज म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!