Thursday, January 20, 2022

अण्णा हजारे म्हणाले मला तुमच्या भांडणात पडायचं नाही, पण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आमदार निलेश लंके आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातल्या वादावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केलं आहे. मला या दोघांच्याही भांडणात मध्ये पडायचं नाही पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो की आत्महत्येसारखा विचार बरा नाही, हा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला त्यांनी तहसीलदार देवरे यांना दिला.

अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.

काय म्हणाले अण्णा हजारे?

या आपापसातल्या भांडण मला पडायचं नाही. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी या संबंधी काही बोलणार नाही. फक्त तहसीलदार मॅडमला सांगतो तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त आत्महत्या डोक्यातून काढा, असा सल्ला अण्णा हजारे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना दिला आहे.

इंदोरीकर महाराजांकडून लंकेंवर स्तुतीसुमने

“कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. अगदी तसंच लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही,” अशा शब्दांत प्रसिध्द कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तसेच चांगले काम करताना त्रास होतोच.

मात्र, कोरोनातून बरा होणारा प्रत्येक रुग्ण लंके यांना आशीर्वाद देतोय, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी लंके यांचं कौतुक केलं.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!