Friday, January 21, 2022

सप्टेंबरमध्ये दररोज 4 लाख कोरोना रुग्णांची नोंद? 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील असंख्य लोक प्रभावित झाले होते. अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. नीति आयोगाने आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी गेल्या महिन्यात सरकारला कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. त्यात त्यांनी म्हटले होते की, प्रत्येक 100 रुग्णांमागे 2-3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था तयार ठेवणे गरजेचे आहे.

नीति आयोगाने सप्टेंबर 2020 मध्ये दुसऱ्या लाटेचा अंदाज लावला होता. यामध्ये आयोगाने गंभीर /मध्यम लक्षणे असलेल्या 20 रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता सांगितली होती.कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर मोठ्या संख्येने रुग्णालयांमध्ये बेड तयार ठेवण्याची सूचना केल्या आहेत.

या सूचना दूसऱ्या लाटेच्या एप्रिल ते जूनच्या  पॅटर्नवर आधारित आहेत. दुसरी लाट शिखरावर असताना देशात ऍक्टिव केसेस 18 लाख होते. 10 राज्यांमध्ये बहुतांश रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता पडली होती. यामध्ये 2.2 टक्के लोक आयसीयूमध्ये भरती होते.
नीति आयोगाने म्हटले आहे

की, बदलत्या परिस्थितीनुसार आपण तयार रहायला हवे. आयोगाने एका दिवसात 4-5 लाख कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबत पुढच्या महिन्यापर्यंत 2 लाख आयसीयू बेड तयार असायला हवे.  वेंटिलेटरसोबत  1.2 लाख आयसीयू बेड, 7 लाख बिना आयसीयू बेड, 10 लाख कोविड आयसोलेशन केअर बेड असायला हवे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!