Friday, January 21, 2022

इंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ संतापल्या; महिलांना छळायची शिकवण देताय का?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील वर्षी पुत्रपाप्तीसंबंधी वादग्रस्त विधान केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची भाजपने उघड बाजू घेतली होती. असे असेल तरी आता मात्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ  यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

‘सत्तेतील बेलगाम घोड्यांना हत्ती म्हणत बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?’ असा सावल वाघ यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता केला आहे.पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपप्रकरणातून वाघ यांनी ही टीका केली आहे. लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप तयार केली होती.

नंतर ती समाज माध्यमांतून व्हायरल झाली. लोकप्रतिनिधी म्हणजे पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके होय. देवरे यांनी त्यांचे नाव घेतले नसले तरी लंके यांनी स्वत: पुढे येऊन आरोप फेटाळले होते. या प्रकरणात सुरवातीपासून वाघ यांनी देवरे यांची बाजू लावून धरली आहे. महिला म्हणून त्यांना त्रास होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

दरम्यान लंके यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये इंदुरीकरांचेही कीर्तन झाले. कीर्तनातून त्यांनी आमदार लंके यांचे मोठे कौतूक केले. इंदुरीकर म्हणाले होते, ‘हत्ती गावात आला की त्याच्यावर कुत्री भुंकत असतात. परंतु हत्ती

आपली चाल बदलत नाही तो ध्येयाकडे चालत राहतो. त्यामुळे लंके तुमच्यावर कोणी कुत्री भुंकत असली तर तुम्ही त्याकडे लक्ष ने देता तुमची यशाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल सोडू नका,’ असेही इंदुरीकर म्हणाले.या अनुषगांने वाघ यांनी एक ट्वीट केले आहे, त्यांनी म्हटले आहे की, ‘राज्यातील

भोळ्या भाबड्या भगिनी मन लाऊन ज्यांचं किर्तन ऐकतात त्या ह.भ.प नी एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कडून होणाऱ्या त्रासाची तुलना ‘कुत्री भुंकतात’ अशी करणं अतिशय दुदैवी… या सत्तेतील बेलगाम घोड्यांना ‘हत्ती’ म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?’ असे वाघ यांनी म्हटलं आहे

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!