Thursday, January 20, 2022

पोलीस वाहनातून पळून जातानाच जखमी झाला सादिक अन्…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र. न्यूज:भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील आठवड्यामध्ये आरोपीचा पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात प्राथमिक अहवालानुसार सदरची घटना ही गाडीतून आरोपी पळून जाताना पडून जखमी झाला असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर येत आहे.

मात्र, दुसरीकडे या प्रकरणांमध्ये आरोपी आणताना हलगर्जी केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले आहे.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोस्को गुन्ह्यातील आरोपी पसार झालेला होता, त्याचा शोध घेण्यासाठी भिंगार

पोलीस मागील आठवड्यामध्ये आरोपी सादिक बिराजदार याला पकडण्यासाठी गेले असता, भिंगार जवळील नाल्याजवळ त्यांनी पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणांमध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता. उपचारादरम्यान तो मयत झाला.यासंदर्भात पोलिसांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता.

तर दुसरीकडे बिराजदार यांच्या पत्नी रुकसार यांनी जी फिर्याद दिली होती, त्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे येथे दाखल झाले होते. त्यानुसार या दोन्ही प्रकरणांची व घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्यानंतर येतील घटनेचा तपास करून प्राथमिक अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आलेला आहे.

प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर यामध्ये सदरची घटना ही पोलीस विभागाच्या आरोपी पकडण्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही झालेली नाही. जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही, असे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. या संदर्भामध्ये अंतिम अहवाल

प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलिसांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
तपासाच्या प्राथमिक अहवालामध्ये सदरची घटना ही पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घडलेली आहे, हे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे, पण यासंदर्भातला अहवाल अंतिम आल्यानंतर सर्व बाबींचा उलगडा स्पष्ट होईल, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

आम्ही  फिर्यादीच्या चौकश्या केलेल्या आहेत. तसेच जे कोणी पोलिस या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा निश्चितपणे कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाची खात्यांतर्गत चौकशीमध्ये या बाबी समोर आलेले आहेत. मात्र भिंगार कॅम्प मध्ये घडलेल्या प्रकाराचा सीआयडी स्वतंत्र तपास करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल आला असून यात प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. डोक्याला व शरीराला जखम झाली असल्याचे यात म्हटले आहे. सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही. मात्र फॉरेन्सिक विभागाकडून आलेल्या अहवालामध्ये सदरची घटना ही अपघात असल्याचे दिसून येत आहे, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पोलीसांकडून दाखल करण्यात आलेली फिर्याद, मृत्यूप्रकरणी दाखल झालेली अकस्मात मृत्यूची नोंद व बिराजदार यांच्या पत्नीने केलेली फिर्याद या सर्वांचा तपास सुरूच आहे. सीआयडीकरून सुरू असलेल्या तपासादरम्यान या सर्वांचा तपास होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीनंतर सीआयडी करून सुरू असलेल्या तपासात काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!