Thursday, January 20, 2022

तहसीलदार देवरे यांच्या चालकाला मध्यरात्री धमकावले ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधातील निवेदनावर त्यांच्या वाहन चालकाला सही करण्यास धमकावत नेत बळजबरीने भाग पाडले गेले असल्याचे समोर आले आहे.

कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष:
याबाबत चालक आबा औटी यांनी तहसीलदार देवरे यांना हकीकत सांगून लेखी म्हणणे मांडले आहे. त्यावर देवरे यांनी तडक जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आज दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी यांनी यासाठी वेळ राखून ठेवला आहे. त्यानुसार भेट होऊन प्रत्यक्ष चर्चा करण्यात येईल. तथापि, याप्रकरणी काय कारवाई होणार, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

ऑडिओ क्लिपमुळे गोंधळ:
तहसीलदार देवरे यांची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली. त्यानंतर राज्यातील महसूल आणि राजकारण क्षेत्रांत गोंधळ उडाला. विरोधकांनी या संदर्भात राज्य सरकारला धारेवर धरत चौकशीची मागणी केली आहे.

अण्णांची भेट घेऊन मंडळी भूमिका:
देवरे यांची ही ऑडिओ क्लीप राष्ट्रवादीच्या आमदार निलेश लंके यांच्याकडे बोट दाखवणारी आहे. त्यातून आमदार लंके यांनी त्यावर भूमिका मांडली आहे. “देवरे यांची चौकशी सुरू असून त्या त्यातून वाचण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहे,” असे आमदार लंके यांनी सांगितले.

देवरे यांनी यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. याच दरम्यान आमदार लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. देवरे यांच्या विरोधात प्रस्तावित असलेल्या चौकशी अहवालाची माहिती दिली. देवरे यांनीही अण्णा हजारे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली.

देवरेंच्या चालकाची बळजबरीने सही:
दरम्यान, देवरे यांच्या वाहनावर कार्यरत असलेला सरकारी चालक आबा औटी यांना बळजबरीने देवरे यांच्या विरोधात निवेदनावर सही करण्यास भाग पाडण्याचा प्रकार काल रात्री समोर आला. यासाठी आबा औटी यांना काल रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या पारनेरमधील कोर्ट गल्ली परिसरातील घरातून फोन करून नेण्यात आले.

यासाठी वारंवार दोघे जण फोन करत होते. वारंवार फोन करणाऱ्या दोघांचे नाव या अर्जात आहे. देवरे यांच्या विरोधात देण्यात येणाऱ्या अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी औटी यांना बळजबरी करण्यात येत होती. अशी माहिती औटी यांनी देवरे यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडली आहे. देवरे आणि चालक आबा औटी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात असून लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!