Thursday, January 20, 2022

शंकरराव गडाख हे मंत्री असले तरीही तालुक्यासाठी पालकमंत्री म्हणूनच काम करता:महंत भास्करगिरी महाराज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राहुल कोळसे पाटील:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगड फाटा ते श्री क्षेत्र देवगड  या पाच कोटी रुप खर्चाच्या डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन सोमवार (ता. २३) रोजी महंत भास्करगिरी महाराजांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

यावेळी हभप रामनाथ महाराज पवार,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले, संचालक भाऊसाहेब मोटे, बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे दादासाहेब शेळके, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, सदस्य रविंद्र शेरकर, प्रसिद्ध गायक राम व बजरंग विधाते, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के  उपस्थित होते.

यावेळी महंत भास्करगिरी महाराज म्हणाले, ” गडाख हे मंत्री असले तरीही ते नेवासे तालुक्यासाठी पालकमंत्री म्हणूनच काम करतात. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सर्वसमावेशक विकासाचे काम केले त्याच पद्धतीने त्यांच्या कार्याचा वारसा घेत मंत्री गडाख हे काम करत आहेत. तसेच
राजकारण, धर्मकारण व समाजकारण या तिन्हीच्या माध्यमातून त्यांनी बंधुत्व निर्माण करण्याचे काम केले.

समाजाला कामाच्या माध्यमातून सुखी करण्यासाठी मंत्रीपदासारखी शक्ती आवश्यक असते. आणि ती आपल्या तालुक्याला मंत्री गडाखांच्या रूपाने लाभली आहे. असे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. काकासाहेब गायके यांनी केले. यावेळी गणेश भोरे, प्रा बाळासाहेब शिंदे, हरिभाऊ शेळके, सरपंच अजय साबळे, कैलास झगरे, भीमाशंकर वरखडे, महेश मते आदी उपस्थित होते.

३५० किलोमीटरचा मास्टर प्लॅन : मंत्री शंकरराव गडाख

“श्रीक्षेत्र देवगडचा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तो गुणवत्तापुर्ण पद्धतीने वेळेत पूर्ण करून घेणार असून बंधुत्वाच्या भावनेतून व मंत्रीपदाच्या माध्यमातून आपण काम करत रहाणार आहे. तालुक्यातील रस्त्यांसाठी पहिल्या बजेट मध्ये १०० कोटी तर दुसऱ्या बजेट मध्ये ५० कोटी रुपयांचा निधी ४४ रस्त्यांसाठी मंजूर करून आणला.

तालुक्यातील ३५० किलोमीटर रस्त्याचा मास्टर प्लॅन ही तयार केलेला आहे. कितीही अडचणी आल्या तरी मी रस्ते पूर्ण करेन असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!