Thursday, January 20, 2022

अजित पवार काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बैलगाडा शर्यतीवरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सांगली पोलिसांना गुंगारा देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी गनिमीकाव्यानं झरे गावात बैलगाडा शर्यत घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते.

आता पडळकर यांनीही अजित पवारांना उत्तर दिलं आहे. बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी अजितदाद काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही. अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचं सरकार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला.

कराडमधील बैलगाडा मालक धनाजी शिंदे यांच्या घरी गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली. अजितदादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही. त्यांनी अनेकदा वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहे. हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यांची भाषणं काढून पाहा. बैलगाडा शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही,

अशी त्यांची भाषणं आहेत, असा टोला पडळकरांनी लगावला आहे. झरे गावातील आंदोलन सरकारला मोडून काढायलं होतं. दोन वर्षात कोर्टाकडे का गेला नाहीत. मराठा आरक्षणाचा वकील त्यांनीच नेमला होता. सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही. म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाहीत. आजचं सरकार मोगलांच्या वृत्तीचं असल्याचा आरोपही पडळकर यांनी केलाय.

अजित पवार काय म्हणाले होते?

“बैलगाडा शर्यत केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला प्रश्न आहे. संसदेत अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. सध्या काहीजण स्टंटबाजी करत आहेत. जे स्टंट करतात त्यांचंच मागच्या पाच वर्षात सरकार होतं. त्यांना कोणीही अडवलं नव्हतं. आताही केंद्रात त्यांचंच सरकार आहे. सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे.

आम्ही लोकांचं भलं करतोय असं दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे”, अशा शब्दात अजितदादांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता निशाणा साधला.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!