Saturday, January 22, 2022

नगर जिल्ह्यात रक्षाबंधनाच्या दिवशीच युवतीवर घडला तो धक्कादायक प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरकरांच्या आवडीचे ठिकाण असलेला प्रवरेकाठचा गंगामाई घाट तेथील व्यसनी युवकांच्या वर्दळीमुळे फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला व युवतींसाठी धोकादायक बनला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रसन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका युवतीचा हात धरुन

तिची छेड काढल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी, रविवार रोजी सायंकाळी चारच्या सुमारास नेहमीप्रमाणे गंगामाई घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका युवतीला अमली पदार्थांच्या सेवनाने धुत्त झालेल्या दोघांनी हेरले.त्यापैकी एका युवकाने तिच्या दिशेने आगेकुच केली.

घटनेचे गांभीर्य व अघटीताची चाहूल लागल्याने तिने त्याला खडसावले, पोलीसांना फोन करण्याची धमकी दिली मात्र, त्याला न जुमानता त्याने तिच्या हाताला धरुन तिला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा दुसरा साथीदार त्याला प्रोत्साहन देत होता. या घटनेने घाबरलेल्या त्या युवतीने प्रसंगावधान राखून मदतीसाठी आरडाओरडा केल्याने,

केशवतिर्थ मंदिराजवळ बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे ते दोघेही दुचाकीवरुन पसार झाले. तिने प्रथम संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि नंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना फोनवरुन झालेला प्रकार सांगितल्यानंतर पोलीसांनी तो परिसर पिंजून काढला. मात्र संशयित आढळले नाहीत. या प्रकरणी सहभागी असलेल्यांची नावे पोलीसांना खबऱ्यामार्फत मिळाली आहेत.

प्रवरेकाठच्या या परिसरातील अनेक मंदिरे, दशक्रियाविधी घाट यामुळे या परिसरात धार्मिक नागरिक व महिलांची कायम वर्दळ असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा परिसर अंमली पदार्थांसह मद्यसेवन करणाऱ्या टारगट युवकांच्या टोळ्या तसेच स्थानिक अवैध वाळू तस्करांचा अड्डा बनला आहे.

कालच्या घटनेने या परिसरात होवू शकणाऱ्या संभाव्य घटनांची नांदी दिल्याने, या परिसरात बीट मार्शलची गस्त वाढवून सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!