Friday, January 21, 2022

नोकरदारांनी लगेच भरला पाहिजे हा फॉर्म, नाहीतर मिळणार नाही ७ लाखांचा फायदा, पाहा कसे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर तुम्ही नोकरी करत असाल आणि ईपीएफओचे सदस्य असाल म्हणजे तुमचे पीएफ खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओ आपल्या सदस्यांसाठी पीएफ आणि पेन्शनव्यतिरिक्त आयुर्विम्याचाही लाभ देते.

या योजनेअंतर्गत पीएफ खातेधारकांना ७ लाख रुपयांचा आयुर्विमा मोफत मिळतो. यासाठी पीएफ खातेधारकांना कोणताही प्रिमियम भरावा लागत नाही. मात्र या ७ लाख रुपयांच्या आयुर्विम्याचा फायदा घेण्यासाठी नोकरदारांनी एक फॉर्म भरणे गरजेचे आहे.

जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुमच्या कुटुंबाला याचा लाभ मिळणार नाही. ईडीएलआय योजनेअंतर्गत हा लाभ मिळवण्यासाठी काय करायचे हे जाणून घ्या.यासंदर्भात ईपीएफओने अलीकडेच एक अधिसूचना जाहीर केली आहे. यात ईपीएफओने आपल्या सर्व पीएफ खातेधारकांना आपले ई-नामांकन जमा करण्यास सांगितले आहे.

जेणेकरून पीएफ खातेधारकाच्या  कुटुंबाला त्याच्या पश्चात विम्याच्या रकमेचा लाभ मिळू शकेल. ईपीएफओ ही देशातील प्रमुख संस्था आहे जी ईपीएफ अॅंड एमपी अॅक्ट, १९५२ कायद्याअंतर्गत संघटित आणि बिगरसंघटित कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा पुरवते.

ईपीएफचे सर्व खातेधारक एम्प्लॉयीज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, १९७६ अंतर्गत कव्हर केले जातात. ईडीएलआय योजनेअंतर्गत ईपीएफ खात्यावर ७ लाख रुपयांपर्यतचे मोफत आयुर्विमा कवच मिळते. सध्या ईपीएफ कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतनाच्या १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा होते.

कंपनीदेखील कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात १२ टक्के रक्कम जमा करते. मात्र ही रक्कम दोन हफ्त्यात जमा होते. कंपनी ३.६७ टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि ८.३३ टक्के रक्कम ईपीएस मध्ये जमा करते. कंपनीकडून ईडीएलआयमध्ये जमा करण्यात आलेल्या ०.५ टक्के रकमेच्या कॉन्ट्रिब्युशनअंतर्गत ईपीएफ खातेधारकांच्या नॉमिनीला ७ लाख रुपयांचे आयुर्विमा संरक्षण मिळते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!