Tuesday, January 18, 2022

चिंताजनक!डेल्टा पल्सचे एकाच दिवसात तब्बल इतके रूगण तर नगर जिल्ह्यात येवढे रूगण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाची  दुसरी लाट  नियंत्रणात आली. मात्र राज्यात डेल्टा व्हेरिएंटनं  थैमान घालतो आहे. विशेषत: डेल्टा प्लस  रुग्णांची  संख्या आता वाढू लागली आहे. आज दिवसभरात डेल्ट प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे.

राज्यात आता डेल्टा प्लस रुग्णांची एकूण संख्या 103 झाली आहे. दिवसभरात डेल्टा प्लसचे 27 रुग्ण वाढले आहेत.  त्यामुळे आता डेल्टा प्लसने राज्य सरकारची चिंता वाढवली आहे. आज सर्वाधिक रुग्ण अमरावती आणि गडचिरोतील सापडले आहेत.

दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
अमरावती – 6
गडचिरोली – 6
नागपूर – 5
नगर – 4
यवतमाळ – 3
नाशिक – 2
भंडारा – 1

डेल्टा प्लस म्हणजे AY.1 हा डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन आहे. जो अधिक संसर्गजन्य आहे. जूनमध्ये हा व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली होती.महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण एप्रिलमध्ये सापडला होता. जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

तर जुलैमध्ये डेल्टा व्हेरिएंटची रुग्ण संख्या शून्यावर आली होती. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही, अशी दिलासादायक माहिती दिली होती. पण आता ऑगस्टमध्ये डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!