Thursday, January 20, 2022

निळवंडेसाठी भाजपा सरकारने निधी दिला पण जिल्ह्यातील दोन मंत्री त्याचे श्रेय घेत आहे:माजी मंत्री कर्डीले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर बाह्यवळण रस्ता चौपदरीकरण कार्यक्रमप्रसंगी ते वाळुंज (ता.नगर ) येथील राम सत्य लॉन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप,

बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग, दीपक कार्ले, बन्सी कराळे, तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन सुरेश सुंबे, मनोज कोकाटे, संजय गिरवले,अरुण होळकर, संजय धामणे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार कर्डीले म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात भु संपादन पैसे मिळण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पहावी लागत होती पण आता आधी पैसे मिळतात मग काम सुरू होते.निळवंडेसाठी भाजपा सरकारने निधी दिला आणि जिल्ह्यातील दोन मंत्री त्याचे श्रेय घेत आहेत

.माझ्या चार वेळच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये जेवढी रस्त्यांची कामे झाली नाहीत तेवढी कामे फडणवीस सरकारच्या काळात झाली. जिल्ह्यातील कोणत्याही मंत्र्यांनी कोरोना काळात कोव्हिड सेंटर सुरू करून जनतेला मदत केली नाही.मंत्रीपदाचा फायदा फक्त स्वतः साठी केला असे कर्डीले म्हणाले.

दरम्यान यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले की पुढील 2 वर्षात माझ्या मतदार संघात 5 हजार कोटींची कामे पूर्ण होतील. महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि त्यांचे आमदार भाजप काळात मंजूर कामांची अनेक लोकप्रतिनिधी उद्घाटन करीत आहेत. हा बाह्यवळण रस्ता हा एक हजार कोटी रुपयांचा असून 40 किमी लांबीचा आहे.

त्यात 7 उड्डाणपूल असणार आहेत. उत्तर महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांच्या विकास कामांच्या निधीपेक्षा माझ्या मतदारसंघातील विकास कामांचा निधी निश्चित जास्त असल्याचेही खा.विखे यांनी सांगितले.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते यांचेही भाषण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्वव काळापहाड यांनी तर आभार संतोष म्हस्के यांनी मानले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!