Thursday, January 20, 2022

नगरमधील ‘ती’ धक्कादायक घटना; तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणताना वाहनातून पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यासंबंधी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत एका उपनिरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना घडली होती.

पोलिसांची गाडी अडवून काही गुडांनी पतीला मारहाण केल्याची फिर्याद आरोपीच्या पत्नीने दिली होती. त्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले होते. शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक माहितीनुसार वाहनातून पडून आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज सायंकाळी पोलिसांवर कारवाईचा आदेश दिला. भिंगार कँप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, सहायक फौजदार नैमुद्दीन शेख व पोलीस कर्मचारी पालवे यांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी भिंगारचे पोलीस आरोपी

 सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय ३२ रा. मुकुंदनगर) याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात निघाले होते. भिंगार नाला परिसरात सादिक जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी फिर्याद देऊन आरोपी बिराजदार याने

पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वाहनातून उडी घेतल्याने तो जखमी झाल्याची फिर्याद दिली होती. तर बिराजदार याच्या पत्नीने दुसरी फिर्याद देऊन गुंडांनी वाहन अडवून आपल्या पतीला मारहाण केल्याचे म्हटले होते. रुक्सार बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद,

रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!