Thursday, January 20, 2022

याठिकाणी सलूनच्या नावाखाली सुरू होता सेक्स रॅकेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात सलूनच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सलूनवर छापा टाकत ही कारवाई केली आहे. यावेळी नागपूर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे तर दोन मुलींची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सलूनमधून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मेडिकल चौक परिसरातील या सलूनवर छापा टाकला आणि कारवाई केली आहे.

छापा टाकल्यावर घटनास्थळावरुन नागपूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. नागपूर पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, सलूनवर छापा टाकल्यावर घटनास्थळावरुन आम्ही दोन मुलींची सुटका केली आहे. यापैकी एका मुलीचं वय 27 वर्षे आहे तर एक मुलगी ही अल्पवयीन आहे.

या प्रकरणी नागपूर पोलिसांनी संबंधित कलमांनुसार, गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात आणखी कुणी सहभागी आहे का? तसेच हे एक मोठं रॅकेट आहे का? या दृष्टीने सुद्धा पोलीस तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!