माय महाराष्ट्र न्यूज: नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका नोकरी मिळवण्याची संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका,
सार्वजनिक आरोग्य विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिचारिका या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी
यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 मार्च 2023 असणार आहे.परिचारिका म्हणून नोकरी करत असाल तर पगार खूप मोठा मिळत असतो. तुम्ही नर्सची नोकरी आधी केली
असेल आणि दुसरी संधी शोधत आहात कर मुंबई महापालिकेने आणलेली संधी तुमचं नशीब बदलणारी आहे. पद – परिचारिका एकूण जागा – 652
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
परिचारिका .या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसेच उमेदवांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.तसेच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
परिचारिका – 35,400 – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रे आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं.
शाळा सोडल्याचा दाखला.
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
कुठे करणार अर्ज
वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011
अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 मार्च 2023 तर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 21 मार्च 2023