Saturday, January 22, 2022

अहमदनगरमध्ये राणेंविरुद्ध गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूथ:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारली असती, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, श्याम नळकांडे, स्मिता अष्टेकर आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अनेक ठिकाणी गुन्हे दाखल:
भारतीय जनता पार्टीच्या जनआशीर्वाद यात्रे दरम्यान महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर मुंबई, चिपळूण, नाशिक, पुणे, औरंगाबाद याठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

त्यानंतर अहमदनगरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य:
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काहीशी गफलत झाली, त्यावर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी, अशा चुकीबद्दल मी कानाखाली लगावली असती, देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली, स्वातंत्र्य दिनाचे हे अमृतवर्ष आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती नाही, मी असतो तर कानाखाली लगावली असती, असे वक्तव्य नारायण राणे यांनी महाडमध्ये पत्रकार परिषदेत केले.

राणेंनी असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांबाबत केल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसेना आक्रमक झाली. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेकडून राणेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. अहमदनगरमधील भाजप कार्यालयासमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!