Friday, January 21, 2022

…अन् नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकच निघाला वाळू तस्कर ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वाळू तस्करी करत असल्याचा धक्कादायक उल्लेख पारनेर तहसीलदारांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. हे शिक्षक तीन वर्षात कधीही शाळेवर गेले नाहीत. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली आहे.

जिल्हा गौण खनिज अधिकारी व लिपिक यांना भाळवणी कोविड सेंटरमध्ये झालेल्या मारहाणीत या शिक्षकांचाही समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे प्राथमिक शिक्षक शालेय कामकाज करत नाही, याची माहिती पारनेरचे गटविकास अधिकाऱ्यांना असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई ते करत नाहीत.

पोलीस अधिकाऱ्यांसमोर लोकप्रतिनिधी कायदा हातात घेतात. हा प्रकार महिला तहसीलदारांना तणावाखाली ठेवणारा असून याची चौकशी होऊन पोलिस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी देवरे यांनी या तक्रारीत केली आहे.

प्रांत अधिकारी सुधाकर भाेसले यांच्यामार्फत तहसीलदारांवर खोट्या अ‍ॅट्रॉसिटीचा दबाव आणण्यात आला. कार्यालयातील काही लिपिक लोकप्रतिनिधींना तहसीलदाराची माहिती पुरवितात. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांविरोधात तक्रार अर्ज दिले आहेत.

हा तक्रार अर्ज देणाऱ्यांमध्येही आणखी एका प्राथमिक शिक्षकांच्या नावाचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. हे शिक्षक शिस्तभंग विषयक वर्तन करत ते कधीही शालेय गावात राहत नसल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत महसूल विभागातील वरिष्ठांचींही नावे आहेत. तालुक्याचे आमदार, प्रांताधिकारी सुधाकर भाेसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अरुण रोडे, अरुण आंधळे, धोंडीबा शेटे या व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अडथळा आणून मानसिक

स्वास्थ्य व कामकाजावर परिणाम करत आहे, असा उल्लेख या तक्रारीत असून मदतीची याचना राज्य महिला आयोगाकडे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!