Tuesday, January 18, 2022

स्वस्त झालं सोनं-चांदी, किंमतीत मोठी घरसण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही देखील सोनंखरेदीचा विचार करत असाल तर सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सोन्याचांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याची वायदे किंमत  0.19 टक्क्यांनी कमी होऊन 47,495 रुपये प्रति तोळा झाली आहे.

.तर चांदीचे दर 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 62,798 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी पाहायला मिळाली होती. मात्र गेल्या वर्षभराचा विचार केला तर सोन्याच्या किंमतींचे प्रदर्शन घसरणीचे आहे.

ग्लोबल मार्केटबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी आज सोनं स्वस्त झालं आहे. स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर दर 1,801.78 डॉलर प्रति औंसवर आहेत. चर चांदीचे दर 0.5 टक्क्यांच्या घसरणीनंतर 23.54 डॉलर प्रति औंस आहेत.

गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50630 रुपये, चेन्नईमध्ये 48670 रुपये, मुंबईमध्ये 47270 रुपये आणि कोलकातामध्ये 49410 रुपये प्रति तोळा इतका आहे.

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

कशी ओळखाल सोन्याची शुद्धता?
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही

तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!