Friday, January 21, 2022

नगरमध्ये अल्पवयीन मुलीस आई वडिलांनी अमानुष मारहाण करत काढले घराबाहेर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अल्पवयीन मुलीला मारहाण करत घराच्या काढल्याप्रकरणी सावत्र आई व वडिलांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ललिता तीरथ दिव्यंका व तीरथ दिव्यंका रा. तपोवन रोड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

चाईल्ड लाईन कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी मधु दिव्यंका हिची आई वडिलांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली आहे. चाईल्ड लाईन सदस्य प्रवीण कदम यांनी फिर्याद दिली आहे.५ ते ६ दिवसांपासून एक अल्पवयीन मुलगी तपोवन रोड परिसरात बेवारस अवस्थेत फिरत होती. तिच्या शरीराला जखमा सुद्धा आहे.

असा फोन चाईल्ड लाईनला आला. चाईल्ड लाईनचे प्रवीण कदम आणि प्रियंका गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने त्यांना सांगितले की, माझी सावत्र आई दारू पिऊन दररोज मला मारत असते, अंगाला चटके देत असते, जेवण देत नाही,

घरा बाहेर काढते. मागील पाच दिवसापूर्वी आईने खूप दारू पिऊन मला लाटण्याने डोक्याला, हाताला, डोळ्याला मारले होते. या कारणाने मी घरातून निघून आले. तेव्हापासून मी असेच फिरत आहे आणि जे काही मिळेल ते मी खात आहे, अशी व्यथा त्या मुलीने चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

याबाबत त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस कर्मचारी शिरीष तरटे, महिला कर्मचारी गहिले यांना घटनास्थळी पाठविण्यात आले.  चाईल्ड लाईनचे कदम यांच्या फिर्यादीवरून मारहाण  करणार्‍या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!