Thursday, January 20, 2022

संगमनेर शिवसेनेकडून शौचालयालाच नारायण राणेंचे नाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याच्या वक्तव्याचे संगमनेर तालुक्यातही पडसाद उमटले आहेत.

संगमनेर तालुका व शहरातील शिवसैनिकांच्या वतीने आज बस स्टँड समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी येथील शौचालयास नारायण राणेंचे नाव देत त्याच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व संगमनेर शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी ,संपर्कप्रमुख विदर्भ गोंदिया-भंडारा नरेश माळवे ,कामगार सेना जिल्हाप्रमुख अहमदनगर मुजीब शेख , तालुकाप्रमुख महिला आघाडी शीतल हासे ,रविंद्र कानकाटे ,अमोल कवडे ,आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सूक्ष्म , लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी आहे . मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताच जन आशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश त्यांना पक्षाकडून मिळाली आहे . सध्या ते कोकणात आहेत . कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी काल महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला . मात्र , टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले . त्या दिवशी नाही का ? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून … अरे हीरक महोत्सव काय ?

मी असतो तर कानाखालीच चढवली असती , असे नारायण राणे म्हणाले.या वक्तव्यावरून राज्यात शिवसेनेकडून पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!