Friday, January 21, 2022

कोरोना लशीच्या 2 डोसमधील अंतर कमी होणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात जास्तीत जास्त कोरोना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता कोरोना लसीकरणात  मोठा बदल होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने एक निर्णय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय म्हणजे कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत आहे.

सध्या देशात दिल्या जाणाऱ्या इतर लशींच्या तुलनेत  पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमध्ये सर्वात जास्त गॅप आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या 12 ते 16 आठवडे आहे. पण ते आता पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आता पुन्हा कमी करण्याचा सल्ला केंद्र सरकारला देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात काम इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन (IAPSM)  या संस्थेने केंद्र सरकारला कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली आहे.

यावर केंद्र सरकार विचार करत असल्याचं IAPSM ने सांगितलं आहे. तसंच संस्थेने एकदा कोरोना संसर्ग झालेल्यांना लस न देण्याचाही सल्ला दिला आहे.IAPSM च्या अध्यक्ष डॉ. सुनीला गर्ग यांनी सांगितलं की, आम्ही लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

 जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण ही आमची प्राथमिकता आहे. ज्यांना कोरोना संसर्ग झाला आहे, त्यांना कोरोना लस देऊ नका, असाही सल्ला आम्ही दिला आहे.
कोविशिल्डच्या डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस का?जेव्हा कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून जास्तीत जास्त 16 आठवडे करण्यात आलं, तेव्हा देशात लशीचा तुटवडा होता.

आता देशात सहा कंपन्यांच्या लशींना परवानगी मिळाली आहे. दोन डोसमधील अंतर कमी झालं तर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होईल आणि कोरोना रुग्णांना गंभीर होण्यापासून किंवा रुग्णालयात दाखल होण्यापासून दूर ठेवता येईल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!