Friday, January 21, 2022

खासदार विखेंचा जोरदार हल्ला:कोविड सेंटरवर फोटो काढणे एवढाच काहींचा उद्योग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोविड सेंटरवर (covid center) फक्त फोटो काढणे, ते सोशल मीडियावर (social media) प्रसिद्धिमाध्यमातून फ्लॅश करणे, एवढाच आज काहींचा उद्योग सुरू आहे. केंद्र सरकार मात्र कोविडवर शिस्तबद्ध काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दिवसाला २० लाख लोकांचे लसीकरण करीत आहे.

एखाद्या देशाची लोकसंख्याही २० लाख नाही, तेवढे लसीकरण आपण एका दिवसात करतो आहोत. यापुढील काळात गावातील वॉर्ड तेथे लसीकरण उपक्रम प्रत्येक गावात राबवण्यात येईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. कोविड सेंटरवर फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या काही नेत्यांचा त्यांनी खरमरीत शब्दांत समाचार घेतला.

विखे पाटील म्हणाले, की तालुक्यातील प्रत्येक रस्ता, बाह्यवळण रस्ता, सूरत महामार्ग आणि इतर महामार्गाने जोडला जात असल्याने तालुक्यातील युवकांना, शेतकऱ्यांना चांगले दिवस असतील. ज्या गावातून महामार्ग गेलेल्या इतर गावांची प्रगती आपण पाहत आहात. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचा मोबदला लवकरात लवकर मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या विकासाबरोबरच सामान्य नागरिकांचा विकास होणार आहे. तालुक्यातील डोंगरी भागात तातडीने मोबाईल टॉवर उभारण्यावर भर दिला जाणार आहे. नगर तालुक्यातील जनतेचा आणि विखे घराण्याचा एक वेगळा ऋणानुबंध आहे.

तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने कर्डिलेंच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे. नगर तालुक्यातील आगडगाव, रांजणी, हातवळण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, प्रमुख उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!