Thursday, January 20, 2022

नगर ब्रेकींग:कासारे पुलावर टेम्पो उलटला; दोघे जण मात्र ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील संगमनेर तालुक्यातील कासारे येथील पुलावर दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणारा टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातातून दोघेजण बालंबाल बचावले. मंगळवारी ( दि. २४ ) पहाटे ४ वाजेच्या सुमारास कासारे शिवारातील पुलावर समोरून आलेल्या अल्टो कारने कट मारल्याने ही अपघाताची घटना घडली.

तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने चालक विजय बबन जाधव ( रा. फलटण ) व सुपरवायझर सोमनाथ ठेंगे हे दोघेजण गोविंद दुध पिशव्या व दही, श्रीखंड व पनीर असा दुग्धजन्य पदार्थ भरलेला टेम्पो ( क्र. एमएच १० बीआर ३८०३ ) घेवून नगरकडून

नाशिकच्या दिशेने जात होते. दरम्यान कासारे शिवारातील पुलावर समोरून आलेल्या कारने कट मारल्याने सदर टेम्पो उलटून अपघातग्रस्त झाला, असे चालक जाधव यांनी सांगितले. सुदैवाने अपघातातून चालक जाधव व ठेंगे बालंबाल बचावले आहेत.

या अपघाताबाबत पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकली नाही.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!