माय महाराष्ट्र न्यूज:राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी गेल्या
आठ-नऊ महिन्यांपासून घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र आता हाक साठवून ठेवेलेला आहे. मात्र साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू लागला आहे. साठवलेल्या
कापसात पिसवा वाढू लागल्याने, त्वचा विकार होऊ लागले आहेत. त्यासाठी काही शेतकऱ्यांना कापसावर फवारणी करावी लागत आहे. विशेष म्हणजे घरात फवारणी करताना त्याचा वेगळा धोका निर्माण होत आहे.दरम्यान सुरुवातीला कापूस
बाजारात विक्रीसाठी आल्यावर व्यापाऱ्यांनी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विटलने भावाने कापूस विकत घेतला. मात्र त्यानंतर कापसाचे भाव सतत गडगडले. सध्या सहा ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल
भाव मिळत आहे. त्यामुळे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र साठवून ठेवलेला हाच कापूस आता धोकादायक ठरू लागला आहे. या कापसात पिसवा झाल्याने त्वचा विकारांचा
सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अंगावर पुरळ येणे, गाठी होणे, खाज येणे असे त्वचाविकार होत आहेत. यापासून सुटका व्हावी, यासाठी काही शेतकऱ्यांनी कापसाच्या साठ्यावर कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. पण अनेकदा घरात
लहान बाळ आणि वृद्ध आजारी व्यक्ती असल्याने त्यांच्यासाठी फवारणी धोकादायक ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान कापूस आणि कांद्याचे भाव पडल्याने याचे पडसाद आता अधिवेशनात उमटताना पाहायला मिळत आहे. तर यावरूनच विरोधकांनी
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.